लॉरेन्स, सर जॉन लेअर्ड मेअर
लॉरेन्स, सर जॉन लेअर्ड मेअर : (४ मार्च १८११-२७ जून १८७९) ब्रिटिशांकित हिदुंस्थानातील गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (कार, १८६४-६९) त्याचा जन्म रिचमंड (यॉर्कशर) येथे मध्यवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील कर्नल अलेक्झांडर टिपूबरोबरच्या श्रीरंगपटणम् येथील शेवटच्या लढाईत सहभागी होते.